शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीच्या नियोजन आराखड्यासाठी १०० कोटींची अतिरिक्त मागणी

Saturday, 19th January 2019 06:26:37 AM

                       

गडचिरोली, ता.१९: गडचिरोली जिल्ह्यांत चार बाबींवर लक्ष केंद्रीत करुन विकासकामे व्हावीत. त्यात शाळा,अंगणवाडी,आरोग्य व रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे वन, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली.

येथील विभागीय कार्यालय सभागृहात आयोजित गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या २०१९-२० च्या वाढीव मागण्यांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीला वित्त व नियोजन तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर विभागीय आयुक्त संजीव कुमार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित होते. जिल्हा नियोजन निधीची मर्यादा १४५ कोटी असून, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी नियतव्ययाच्या २५ टक्के अधिक निधी यात समाविष्ट करुन एकूण आराखडा १८१ कोटींचा आहे आणि वाढीव मागणी १०० कोटी रुपयांची आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरणात सांगितले.

गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी शासन सकारात्मक आहे असे सांगून वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, शाळा तसेच आरोग्य यंत्रणा याची निकड लक्षात घेऊन गडचिरोलीला मागाल तितका निधी देऊ. तसेच या जिल्ह्यात रोजगार निर्मिती वर भर देणाऱ्या कार्यक्रमांनाही मागाल तेवढा निधी शासन देईल. शाळांसोबत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यादेखील बांधा, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.

परिपूर्ण स्टेडियम होणार

गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा संकूलाच्या जागेचा ताबा मिळाला असून या संकूलासाठी ५२ कोटी रुपयांची विशेष मागणी जिल्हाधिकारी शेखर  सिंह यांनी केली. बांधकाम विभागाने हे काम करावे, असे निर्देश वित्तमंत्र्यांनी दिले. हे क्रीडा संकुल अद्ययावत स्वरुपाचे असणार आहे. याबाबतचे व्हीडिओ सादरीकरण या बैठकीत करण्यात आले.

या संकुलात मुख्य इमारतीसोबत ३९० चौरस मीटर क्षेत्रफळात ५ बैडमिंटन कोर्ट, एक इनडोअर व्हॉलिबॉल कोर्ट, एक इनडोअर सभागृह, ४०० मीटर ट्रॅक व खेळासाठी मैदान यासह खाद्यपदार्थ दुकानांचाही समावेश असणार आहे.

नाट्यगृह

गडचिरोली शहरासाठी एक सूसज्ज नाट्यगृह आवश्यक आहे. याचे काम पूर्ण करण्यासाठी दीड कोटींची रक्कम आवश्यक आहे, अशीही मागणी जिल्हाधिकारी सिंह यांनी केली. 

या बैठकीस गडचिरोलीचे नियोजन अधिकारी टी.एस. तिडके, नियोजन विभागाचे कृष्णा फिरके, सागर पाटील, शीतल नवले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4KCST
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना