शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 16th January 2019 11:02:45 AM

गडचिरोली, ता.१६: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून ट्रॅक्टर मालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारताना काल(ता.१५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरी तालुक्यातील देलोडा बिटाचा वनरक्षक अतुल प्रभाकर धात्रक(३४)वर्ग-३ यास रंगेहाथ पकडले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा ट्रॅक्टरमालक असून, तो रेतीघाटावरुन रेती वाहतुकीचे काम करतो. एका प्रकरणात वनरक्षक अतुल धात्रक याने १५ दिवसांपूर्वी ट्रॅक्टर पकडला होता. परंतु कारवाई न करता त्याने ट्रॅक्टर सोडून दिला. त्याचा व भविष्यात कुठलीही कारवाई न करण्याचा मोबदला म्हणून धात्रक याने तक्रारकर्त्यास १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो १० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल सापळा रचून वनरक्षक अतुल धात्रक यास तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, मिलिंद तोतरे, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0S045
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना