मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षकांनी केले असहकार आंदोलन

Tuesday, 15th January 2019 02:59:26 PM

गडचिरोली, ता.१५: तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख यांनी शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज जिल्हा परिषदेपुढे असहकार आंदोलन करुन त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.  

गडचिरोली तालुक्यातील गिलगाव येथे ९ जानेवारीला तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन पार पडले. उपशिक्षणाधिकारी श्री.चलाख हे अचानक संमेलनस्थळी आले आणि त्यांनी शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु कारवाई न झाल्याने आज विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेपुढे असहकार आंदोलन करुन चलाख यांचा निषेध केला. यावेळी शिक्षकांनी उपशिक्षणाधिकारी श्री.चलाख यांच्या विरोधात घोषणा देत त्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली.

या आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब कल्याण महासंघ, राज्य केंद्रप्रमुख संघ, राज्य पदवीधर शिक्षक संघटना, राज्य पदवीधर शिक्षक महासंघांचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A0H1A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना