गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आरमोरीतून पावणेदोन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघांवर गुन्हे

Friday, 11th January 2019 07:54:18 AM

गडचिरोली, ता.११: आरमोरी येथे पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह टाकलेल्या धाडीत तीन जणांकडून सुमारे १ लाख ७६ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अजित राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी श्री.कुचेकर यांच्यासह हवालदार विजय राऊत, प्रेमकुमार दुर्गे, थामदेव कोहपरे यांनी काल दोन साक्षदारांना सोबत घेऊन ठिकठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी बाजारटोली येथील आनंद श्रीकोंडावार, पालोरा मार्गावरील आरिफ कासमनी व आझाद चौकातील अरफाज लाकडिया यांच्या घरांची झडती घेऊन तेथून सुमारे १ लाख ७६ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. शिवाय तंबाखू किरकोळ विक्रेत्यांना पोहचविण्यासाठी वापरण्यात येणारे एमएच ३३- १२९७ क्रमांकाचे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे टाटा वाहनही ताब्यात घेतले. 

अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. कुचेकर यांच्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिस ठाण्यात उपरोक्त तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानदे अधिनियम २००६ च्या कलम १८८, २७३ भादंवि, ३, ५९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K0LZN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना