गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गो.ना.मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त येथील कमल-गोविंद प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी १२ जानेवारीला 'संत तुकाराम' या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात रात्री ८ वाजता हा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व 'चित्रलेखा'चे संपादक ज्ञानेश महाराव यांची या नाटकात प्रमुख भूमिका असून, तेच या नाटकाचे निर्माता आहेत. बाजीराव राणे लिखित या नाटकाचे दिग्दर्शक संतोष पवार हे असून, डॉ.राम पंडित यांनी संगीत दिले आहे. ज्ञानेश महाराव यांच्याशिवाय लीना पाळेकर, श्रद्धा मोहिते, प्रीती तोरणे, कुशल कोळी, मयुरेश कोटकर, देव कांगणे व विक्रांत आजगावकर हे या नाटकात भूमिका साकारणार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय व छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक भेट रंगमंचावर पाहण्याचा योग प्रेक्षकांना येणार आहे. नाट्यरसिकांनी या प्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कमल-गोविंद प्रतिष्ठान तथा दंडकारण्य परिवारातर्फे प्राचार्य भैयासाहेब ठाकरे यांनी केले आहे.