मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

'आयटक' च्या नेतृत्वात हजारो कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Wednesday, 9th January 2019 06:51:42 AM

गडचिरोली, ता.९: वाढती महागाई व बेरोजगारीला आळा घालावा, नियमित कामावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक बंद करावी, श्रम कायद्यात मजूरविरोधी परिवर्तन करणे बंद करावे इत्यादी मागण्यांसाठी आज 'आयटक' च्या नेतृत्वात हजारो अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक आणि शालेश आहार पोषण कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

'आयटक' चे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव अॅड.जगदीश मेश्राम, राज्य सचिव विनोद झोडगे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपुलवार, खेतमजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव कुंदा चललीलवार, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव राधा ठाकरे, हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगार संघटनेचे जिल्हा सचिव जलील खाँ पठाण आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे नेत्यांनी संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3EL6M
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना