शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली येथील स्‍टेडिअमचा विकास करणार:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

Monday, 7th January 2019 06:02:29 AM

गडचिरोली, ता.७: सीएम चषक स्‍पर्धा हा युवकांमधील सुप्‍त कला व क्रीडा गुणांना चालना देणारा उपक्रम आहे. स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातुन माणुस घडतो. फक्‍त स्‍पर्धा निकोप असावी, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गडचिरोली येथील क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करत विकास करण्‍याची जवाबदारी अर्थमंत्री म्‍हणुन आपण घेत असल्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी केली.

रविवारी(ता.६) गडचिरोली येथे सीएम चषक स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खा. अशोक नेते, आ. कृष्‍णा गजबे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा योगीता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा योगीता पिपरे, प्रकाश पोरेड्डीवार, रवींद्र ओल्लालवार, बाबूराव कोहळे, चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे समाजकल्‍याण सभापती ब्रीजभुषण पाझारे, चंद्रपूर मनपाचे स्‍थायी समिती सभापती राहुल पावडे, भाजपा नेते रामु तिवारी, भाजयुमोचे जिल्हाध्‍यक्ष स्‍वप्‍नील वरघंटे प्रामुख्‍याने उपस्थित होते. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्‍हयातील युवक एकलव्‍यासारखे आहेत. प्रचंड जिद्द व आत्‍मविश्‍वासाच्‍या बळावर यश कवेत घेण्‍याची शक्‍ती त्‍यांच्‍यात आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्‍या विकासासाठी आपण प्रयत्‍नशिल असुन ९० कोटी रुपये निधी आपण मंजूर केला आहे. गडचिरोली-वडसा रेल्‍वे मार्गासंदर्भात वनविभागाच्‍या जागेचा प्रश्‍न आपण सोडविला आहे. गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी ३५ कोटी रूपयांचा निधी आपण दिला असून जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गतसुध्‍दा विशेष बाब म्‍हणून ४४ कोटी रूपयांचा विकास निधी उपलब्‍ध केला आहे.  गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासासाठी आपण वचनबध्‍द असल्‍याचे यावेळी ते म्‍हणाले.

यावेळी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केल्‍याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. सतत विकासाचा ध्‍यास उराशी बाळगणारे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्‍यासारखे नेते सोबत असताना गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासाबाबत काळजी करण्‍याचे कोणतेही कारण नसल्‍याचे खा. नेते म्‍हणाले. सीएम चषक स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिकांचे वितरण करण्‍यात आले. यावेळी नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन भाजयुमोचे शहराध्‍यक्ष तथा सीएम चषक स्पर्धेचे संयोजक अनिल तिडके यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
150FW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना