गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आरमोरी नगर परिषदेची निवडणूक २७ जानेवारीला

Thursday, 27th December 2018 08:03:58 AM

गडचिरोली, ता.२७: बहुप्रतीक्षित आरमोरी नगर परिषदेची निवडणूक पुढील वर्षी २७ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली.

राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची अधिसूचना जारी केली. कर्जत(जि.रायगड), श्रीगोंदा(जि.अहमदनगर) व आरमोरी(जि.गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला(जि.नागपूर) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक, तर तसेच विविध नगर परिषदा व नगर पंचायतींमधील ११ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार, २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. १० जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ जानेवारी ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल, तर २८ तारखेला मतमोजणी करण्यात येईल. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला, तरी कोणत्याही रिट याचिकेमध्ये न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास निवडणूक कार्यक्रम तत्काळ रद्द वा स्थगित करुन आयोगास अवगत करावे, असे निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KG0TV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना