शनिवार, 19 जानेवारी 2019
लक्षवेधी :
  जिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक             देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच             भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले             उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील जेसीबी जाळली

Friday, 21st December 2018 02:05:17 PM

गडचिरोली, ता.२१: सशस्त्र नक्षल्यांनी आज भर दुपारी रस्त्याच्या कामावरील जेसीबी वाहन जाळून मजुरांना मारहाण केल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गट्टागुडा गावानजीक घडली.

गट्टागुडा हे गाव गट्टा पोलिस मदत केंद्रापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. तेथे रस्त्याचे काम सुरु असून, जेसीबी व अन्य वाहने आहेत. काम सुरु असताना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ सशस्त्र नक्षली कामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी काही मजुरांना धमकावून मारहाण केली आणि नंतर जेसीबी वाहन जाळून टाकले. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील वाहन जाळण्याची ही २२ दिवसांतील दुसरी घटना आहे.

३० नोव्हेंबरच्या रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने जाळून टाकली होती. यात १० जेसीबी, ३ ट्रॅक्टर्स, २ मोटारसायकली व १ पिकअप इत्यादी वाहनांचा समावेश होता. नक्षल चळवळीची सूत्रे गणपतीकडून गगन्नाकडे आल्यानंतर नक्षली अधिक हिंसाचार करु लागल्याचे दिसत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VU5VZ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना