गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पदभरती स्थगित करा;अन्यथा मोर्चा काढू:ओबीसींचा इशारा

Tuesday, 18th December 2018 07:07:38 AM

गडचिरोली, ता.१८: अनुसूचित क्षेत्रातील बिगर आदिवासींचे पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या पुनर्विचार समितीचा अहवाल येईपर्यंत जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करावी;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू, असा इशारा ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.

यासंदर्भात ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पदभरती स्थगित करण्याची मागणी केली. महामहीम राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अनुसूचित क्षेत्रात पदभरती करण्यासाठी निर्गमित केलेल्या अधिसूचनेचा पुनर्विचार करण्यासाठी, तसेच ज्या अनुसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे; त्या जिल्ह्यात पदभरतीच्या आरक्षणाचे प्रमाण कशा पद्धतीने निश्चित करावे, याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, या समितीने आपला अहवाल तीन महिन्यांच्या आत सादर करावा, असा निर्णय २७ ऑगस्ट २०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करण्यात यावी;अन्यथा २७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

शिवाय केंद्र सरकारची मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती ओबीसींना शंभर टक्के लागू करावी व त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये करावी, एमबीए, एमसीए, एमटेक, बीबीए, बीसीएच व नर्सिंगच्या अभ्यासक्रमांना मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करावे, त्यांच्यासाठी यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

शिष्टमंडळात प्रा.शेषराव येलेकर, दादा चुधरी, प्रा.देवानंद कामडी, सागर म्हशाखेत्री, पी.पी.म्हस्के, कमलाकर रडके, महेंद्र ब्राम्हणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, जितेंद्र मुनघाटे, पांडुरंग घोटेकर, किरण कारेकर, पी.एम.झंझळ, रेखा चिमूरकर, व्ही.डब्लू.भोयर, खेमराज भोयर, राजेंद्र गोहणे, भोला भोयर, केशव निंबोड, गोपीनाथ चांदेवार, प्रवीण नवघरे, विनोद धंदरे, संदीप चुधरी, गणेश सोनटक्के, प्रशांत वाघरे, रत्नदीप म्हशाखेत्री, प्रल्हाद म्हशाखेत्री, डेपाल बानबले, सचिन गोंगल, पुरुषोत्तम ठाकरे, जीवन नवघडे, आशिष ब्राम्हणवाडे, भूपेश फुलझेले, विजय नवघरे, ताराचंद वाघरे, आर.जी.म्हशाखेत्री आदींचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JGQAQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना