रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी

Tuesday, 18th December 2018 07:02:03 AM

गडचिरोली, ता.१८: येथील दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष व कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना गडचिरोली प्रेसक्लबतर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा 'गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच क्लबचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांची गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. रोख रक्कम व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ६ जानेवारी रोजी पत्रकारदिनी एका खास समारंभात डॉ.मुनघाटे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे हे मागील ३० वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत असून, २० वर्षांपासून ते प्राचार्य आहेत. आतापर्यंत त्यांनी २३ संशोधन प्रबंध(पेपर) लिहिले असून, त्यापैकी २० पेपर प्रकाशित झाले आहेत. डॉ.मुनघाटे यांनी ६ पुस्तकांचे लेखन, तर १० पुस्तके संपादित केली आहेत. त्यांनी २५ राष्ट्रीय व ६ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग नोंदविला आहे.

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक असलेले डॉ.मुनघाटे यांना गोंडवाना विद्यापीठाच्या कला शाखेचे पहिले अधिष्ठाता होण्याचा बहुमान मिळाला. सध्या ते या विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, सिनेट व विद्वत परिषदेचे सदस्य आहेत. रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून, गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे सचिव व महाराष्ट्र प्राचार्य फोरमचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. विविध संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध आहे.

आजतागायत डॉ.मुनघाटे यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यात ग्लोबल अचिवर्स फाउंडेशन दिल्लीचा आंतरराष्ट्रीय अचिवर्स पुरस्कार- २०१५, गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार-२०१४, आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद दिल्लीचा २००१ चा ज्वेल ऑफ इंडिया पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ.मुनघाटे यांच्या दंडकारण्य संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांची गुणवत्ताही नजरेत भरणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गडचिरोली प्रेसक्लबने त्यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K19ZH
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना