रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

शेकाप गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद

Sunday, 16th December 2018 12:48:05 PM

गडचिरोली, ता.१६: संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी व्यापक आंदोलन उभे करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे. त्याअनुषंगाने फेब्रुवारी २०१९ मध्ये गडचिरोली येथे विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद घेण्याचे पक्षाच्या मध्यवर्ती समितीने ठरविले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक अलिबाग येथे ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार भाई जयंत पाटील, आमदार भाई धैर्यशील पाटील, आमदार भाई पंडितशेठ पाटील, आमदार भाई बाळाराम पाटील, प्रवीणदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार व रविवार असे दोन दिवस घेण्यात आली. या बैठकीत शेकापचे गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानाच्या नुकसानीबाबत मांडणी केली. तसेच जिल्ह्यातील मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्त्याचे दर सरकारच्या जीएसटीमुळे कमी झाल्याने रोजगार हिरावला गेल्याची परिस्थिती मांडून शेकापने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व धान उत्पादक ओबीसी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची विनंती केली. यावर या मध्यवर्ती समितीने फेब्रुवारीत विदर्भातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गडचिरोली येथे दुष्काळ परिषद आयोजित करून सरकारला दुष्काळ निवारणासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यास बाध्य करण्यात येईल, असा निर्णय घेतला. या दुष्काळ परिषदेला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व आमदार, मध्यवर्ती समितीचे राज्यभरातील ३०० सदस्य व सुमारे १० हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीत आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, दत्तू चौधरी सहभागी झाले होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L4XYY
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना