गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास पाच वर्षांचा सश्रम कारावास

Saturday, 15th December 2018 05:18:36 AM

गडचिरोली, ता.१५: जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन इसमास कुऱ्हाडीने वार करुन जखमी करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धर्मपाल रघुनाथ कडाम, रा.डोंगरगाव, ता.देसाईगंज असे दोषी इसमाचे नाव आहे.

आरोपी धर्मपाल कडाम हा पीडित इसमाच्या घरी गेला. तू जादुटोणा केल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि माझी पत्नीही तुझ्यामुळेच आजारी आहे, असे म्हणून धर्मपालने शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने त्याचे हात व मानेवर वार केला. यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्याने आरडाओरड करताच धर्मपाल पळून गेला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान फिर्यादीचे बयाण नोंदवून आरोपीवर कलम ३०७,५०४ भादंवि सहकलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अन्वये देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक सचिन मानकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या खटल्याचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी धर्मपाल कडाम यास ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातफे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IAHJ0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना