गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

धानाच्या योग्य हमीभावासाठी एकत्र या: जयश्री वेळदा

Friday, 14th December 2018 10:57:44 PM

गडचिरोली, ता.१५: धान उत्पादक शेतकरी गटातटाच्या राजकारणात विखुरलेला असल्याने सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील उस व दूध उत्पादक शेतकऱ्यांसारखे एकत्र येऊन धानाच्या हमीभावासाठी संघर्ष करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले.

तालुक्यातील गुरवळा येथील फ्रेंन्डस् नाट्य कला मंडळाद्वारा आयोजित 'संघर्ष संपला रक्ताचा' या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती दुर्लभाताई बांबोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, ओबीसी जागृती अभियानाचे समन्वयक दिनेश बोरकुटे, गुरवळाच्या सरपंच निशा आयतुलवार, विहीरगावच्या सरपंच प्रीती कन्नाके, निर्मला गेडाम, रेखा मंटकवार,पुरुषोत्तम रामटेके,नवयुवक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज कवठे, ग्रामसेवक बारसागडे, अनिल कोठारे, अशोक वासेकर, शांताराम चिकराम प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मंडळाचे कार्यकर्ते विनोद मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मंटकवार,रमेश गेडाम, राकेश इटकेलवार,नरेंद्र मेश्राम,गिरीधर हजारे, बंडू कन्नाके, अनिल पोवनवार,गजानन अडेंगवार,सुरेश भोयर,लालाजी तुंकलवार,चंद्रकांत भोयर, बाबनवाडे, धनराज भोपये यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PJS6L
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना