मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेकापची मौशीखांब-मुरमाडी सर्कल कार्यकारिणी जाहीर

Wednesday, 12th December 2018 12:48:43 AM

गडचिरोली, ता.१२: तालुक्यातील अमिर्झा येथील दत्त मंदिरात नुकतीच मौशीखांब-मुरमाडी सर्कलमधील गावांतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते सर्कल कार्यकारिणी गठित करण्यात आली.

या सभेला शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, जिल्हा सहचिटणीस भक्तदास कोठारे, सोमाजी करकाडे, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, ओबीसी जाग्रूती अभियानाचे समन्वयक दिनेश बोरकुटे, गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, तालुका चिटणीस भाई सुधाकर आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पक्ष सभासदांनी चर्चा करुन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्कल व एरिया समिती पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड केली. त्यानंतर जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी ती जाहीर केली.

 मौशीखांब-मुरमाडी सर्कल चिटणीसपदी रोशन नरुले(भिकारमौशी), खजिनदार-पुरूषोत्तम जुवारे (बेलगाव), सहचिटणीस-अमीन पठाण(अमिर्झा),विकास खोब्रागडे(गिलगाव), देविदास आत्राम(आंबेशिवणी) सदस्य- नागोराव नंदेश्वर(कळमटोला), संजय भैसारे(मौशीखांब), शंकर भुरसे(बेलगाव),चंद्रशेखर आत्राम(मरेगाव), विलास ठाकरे(चांभार्डा), सुधाकर गेडाम(रानखेडा), जीवन मेश्राम(आंबेटोला),चंद्रकांत नरुले(भिकारमौशी), राहुल मडावी(मुरुमबोडी), अनिल कुमरे(बोथोडा), सत्यवान कोहपरे(मौशीचक), पंकज ठाकरे(कातखेडा), फाल्गुन समर्थ(टेंभा) यांची नियुक्ती करण्यात आली.

मरेगाव-मुरमाडी एरिया समितीच्या चिटणीसपदी मनोहर भोयर(मुरमाडी), तर तुषार बोरकर(गिलगाव) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सदस्य सर्वश्री खुशाल मुरतेली(कळमटोला),अतुल राऊत (आंबेटोला), पंढरी गुरनूले (भिकारमौशी), किशोर वेलादी(मरेगाव), विलास उसेंडी(मुरुमबोडी), मनेश कुमरे(बोथोडा), विकास सयाम(कातखेडा), पंकज पत्रीवार(मौशीचक) यांचा समावेश आहे.

मौशीखांब-टेंभा एरिया समितीचे चिटणीस म्हणून चंद्रभान कोमलवार(मौशीखांब), तर खजिनदार म्हणून दिवाकर वाघाडे(टेंभा) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सदस्य धनराज मंटकवार (मौशीखांब), सुरेश पानसे(रानखेडा), चुडाराम समर्थ (टेंभा), दादाजी नैताम(बेलगाव), मनोज सरपे (अमिर्झा), माणिक मेश्राम(चांभार्डा) यांचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SVBA2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना