शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

ब्रम्हपुरी नगर परिषदेवर काँग्रेस-रिपाइं आघाडी एकहाती सत्ता

Monday, 10th December 2018 05:36:34 AM

ब्रम्हपुरी, ता.१०: येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीने नगराध्यक्ष पदासह २० पैकी ११ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिता दीपक उराडे यांनी १ हजार ६४८ मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अशोक भैया यांच्या आघाडीला ५, तर भाजपला केवळ ३ जागा मिळवता आल्या.

चांगले शिक्षण व आरोग्यविषयक सोयींसाठी प्रसिद्ध असलेले ब्रम्हपुरी शहर मुत्सद्दी राजकारणासाठीही ओळखले जाते. अशा या शहराच्या नगर परिषदेत नगराध्यक्षासह २० नगरसेवकांसाठी काल(ता.९) निवडणूक झाली. आज मतमोजणी करण्यात आली. दुपारी १२ वाजतापर्यंत जवळपास सर्वच जागांचे निकाल हाती आले.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-रिपाइं युतीच्या रिता दीपक उराडे यांनी ३५५० मतांनी अशोक भैया यांच्या नेतृत्वातील विदर्भ माझा पार्टीच्या उमेदवार अर्पिता दोनाडकर यांचा पराभव केला. रिता उराडे यांना ८०२० मते, तर अर्पिता दोनाडकर यांना ४४७० मते मिळाली. भाजपच्या यास्मिन बहादूर लाखानी ३८७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. अपक्ष उमेदवार रश्मी कैलाश पेशने(खानोरकर)यांना ३१४२, भारिप बहुजन महासंघाच्या उमा हजारे यांना ८००, अपक्ष पूनम खेमचंद नंदेश्वर यांना ६३४, बहुजन समाज पार्टीच्या सुचिता सेनापती चांदेकर यांना ३९१ व शिवसेनेच्या बबली विनायक दर्यापूरकर यांना ९९ मते मिळाली.

 

प्रभाग क्रमांक १ (कुर्झा) मधून एका जागेवर काँग्रेसचे विलास विखार हे १५६५ मते प्राप्त करुन विजयी झाले. दुसऱ्या जागेवर अशोक भैया यांच्या नेतृत्वातील विदर्भ माझा पार्टीच्या सपना खेत्रे यांनी ११७३ मते मिळवून विजय मिळविला. प्रभाग क्र.२ मधून काँग्रेसच्या लता ठाकूर यांनी १०२६ मते घेऊन विजयश्री खेचून आणली. दुसऱ्या जागेवर भाजपचे सागर आमले ६९८ मते मिळवून निवडून आले. प्रभाग क्र.३ मधून काँग्रेसच्या सारिता पारधी ९९७ मते प्राप्त करुन विजयी झाल्या, तर काँग्रेसचेचे दीपक उर्फ बाला शुक्ला ९३४ मते मिळवून निवडून आले. प्रभाग क्र.४ मधून काँग्रेसच्या वनिता अलगदेवे १०६१ व प्रितिश बुर्ले ७४२ मते घेऊन निवडून आले. प्रभाग क्र. ५ मधून रिपब्लिकन नेते व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक रामटेके हे ९११ मते घेऊन तर काँग्रेसच्याच नीलिमा सावरकर ६६२ मते प्राप्त करुन विजयी झाले. प्रभाग क्र ६ मधून विमापाचे सतीश हुमने (७९८) व अर्चना खंडाते (६९३) हे दोन्ही उमेदवार निवडून आले. प्रभाग क्र ७  मधून विमापाच्या रुपाली रावेकर (९९२) व काँग्रेसचे नितीन उराडे  (८७६) विजयी झाले. प्रभाग क्रमाक ८ मधून भाजपच्या पुष्पा गराडे(७२४) व मनोज वठे(६६८) हे दोन्ही उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसच्या सुनीता खेमराज तिडके(११८९) व विमापाचे गौरव अशोक भैय्या विजयी झाले. प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसचे महेश भर्रे(८४६) व विदर्भ माझा पाटीच्या अंजली उरकुडे(७०४) निवडून आले.

 

हा मनुवद्यांचा पराभव:आ.विजय वडेट्टीवार

 

ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या इतिहासात २५ वर्षांत प्रथमच काँग्रेस-रिपाइं आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आता देशातील जनतेचा कल बदलताना दिसतो आहे. लोकांनी मनुवाद्यांना नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया आघाडीच्या विजयाचे शिल्पकार व काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3KA2D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना