बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

Sunday, 9th December 2018 11:29:58 PM

 

धानोरा, ता.१०: सशस्त्र नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील एका इसमाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अंताराम पुडो(५५) रा.खोब्रामेंढा असे मृत इसमाचे नाव आहे.

अंताराम पुडो तेंदू फळीवर व्यवस्थापक म्हणून काम करायचा, अशी माहिती आहे. खोब्रामेंढा व देवस्थानजीकच्या टी पॉईंटजवळ आज सकाळी अंताराम पुडोचा मृतदेह आढळून आला. त्याची हत्या कशासाठी करण्यात आली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतील पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F9DC2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना