बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पत्रकारसंघाची व्यापारीसंघावर १२ धावांनी मात

Sunday, 9th December 2018 06:37:41 AM

गडचिरोली, ता.९: येथील प्रेक्षागार मैदानावर आयोजित किकेट सामन्यात पत्रकार संघाने व्यापारी संघाचा १२ धावांनी पराभव केला.

आज सकाळी साडेसात वाजता क्रिकेट सामन्यास आरंभ झाला. गडचिरोली प्रेसक्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या नेतृत्वातील पत्रकार संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघाने १२ षटकामध्ये ७ गडी गमावून ९९ धावा काढल्या. रूपराज वाकोडे व रवींद्र कांबळे यांनी जोरदार भागीदारी करून सन्मानजनक धावा काढल्या. व्यापारी संघास १२ षटकांमध्ये १०० धावा काढावयाच्या होत्या. परंतु हे मोठे लक्ष्य असूनही व्यापारी संघाला १२ षटकांत केवळ ८८ धावाच काढता आल्या. व्यापारी संघाचे कर्णधार मनोज देवकुले यांच्या नेतृत्वात खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने फलंदाजी करून आपल्या संघास विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार संघाचे नीलेश पटले यांनी ३ व सरफराज पठाण यांनी १ गडी बाद करून उल्लेखीय गोलंदाजी करीत व्यापारी संघाचा पराभव केला. 

व्यापारी संघाचे गुरूदेव हरडे व हेमंत राठी यांनी चांगले प्रदर्शन केले. मल्लीक नाथानी व गोलू साळवे यांनीही जोरदार फलंदाजी केली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. व्यापारी संघाने फक्त ८७ धावा काढल्या. शेवटच्या षटकात त्यांना १६ धावांची आवश्यकता होती. परंतु पत्रकार संघाचा गोलंदाज बारी शेख याने केवळ ४ धावा दिल्या. त्यामुळे पत्रकार संघाने १२ धावांनी शानदार विजय मिळविला. 

पत्रकार संघात महेश कुकुडकर, आशिष भरणे, प्रकाश खोबरे, नितीन ठाकरे, अनिल तिडके, प्रशांत पापडकर, चंदू कोटगले, नंदकिशोर पोटे, रितेश वासनिक, प्रमोद गेडेकर, केशव हुकरे, रवींद्र मोगीलवार, गजेंद्र डोमळे, दिलीप टिंगुसले, सालोटकर, मयूर रहाटे  यांचा समावेश होता. व्यापारी संघातर्फे समीर अजानी, सानू पटेल, भारत भारद्धाज, अरबाज पटेल, करीम जिवानी, प्रवीण म्हशाखेत्री आदींनी क्रीडाप्रदर्शन केले. सामना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात खेळण्यात आला. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z8G1A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना