मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

तणसीच्या ढिगात कोंबून ७५ वर्षीय वृद्धेने जाळून घेतले स्वत:ला

Thursday, 6th December 2018 06:47:31 AM

गडचिरोली, ता.६: एका वृद्ध महिलेने आपल्या शेतातील तणसीच्या ढिगात कोंबून स्वत:ला जाळून घेतल्याची घटना आज सकाळी देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे घडली. मुक्ताबाई मुकुंदा धोटे(७५)असे मृत महिलेचे नाव आहे.

देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई ही नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतावर गेली. त्यानंतर तिने तणसीच्या ढिगात शिरुन आग लावली. यात तिचा होरपळून मृत्यू झाला. तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मुलाचा कुणावरही संशय नसून तणावाखाली तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

मात्र, मुक्ताबाईने घरगुती वादातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GYC0E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना