शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

देवाजी तोफांच्या गावातील लोकांनी केला सामूहिक गटशेतीचा संकल्प

Thursday, 6th December 2018 07:46:20 AM

गडचिरोली, ता.६: प्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांच्या मेंढा(लेखा) या गावातील नागरिकांनी जागतिक मृदा दिनी वैयक्तिक शेतीऐवजी सामूहिक सेंद्रीय गटशेती करण्याचा संकल्प करुन नव्या अध्यायास सुरुवात केली आहे.

मेंढा येथे काल(ता.५) समाजसेवक देवाजी तोफा यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची सभा झाली. या सभेला ग्रामसभेचे अस्थायी अध्यक्ष मनिराम दुगा, गावपुजारी शिवदास तोफा, प्रा.डॉ.कुंदन दुफारे, तालुका कृषी अधिकारी एन.जी.बडवाईक, कृषी सहायक जे.एस.भाकरे उपस्थित होते. या सर्वांनी सामूहिक गटशेतीचे काय फायदे आहेत, याविषयी माहिती दिली.

मेंढा येथील नागरिक कित्येक वर्षांपासून आपल्या उदरनिर्वाहाकरिता सामूहिक सेंद्रीय शेती करतात. परंतु आता व्यापारी दृष्टिकोनातून बागायती शेती करायची आणि विषमुक्त उत्पादन ग्राहकांना द्यायचे, असा संकल्प गावकऱ्यांनी केला. त्यासाठी शासनाच्या गटशेतीविषयक योजनेला लाभ घेण्याचेही ठरविण्यात आले. 

शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या मेंढा गावात ३०० एकर शेती असून, १०५ कुटुंब आहेत. शंभर एकराचा एक गट याप्रमाणे तीन गट तयार करण्यात आले आहेत. ग्रामसभा ४० टक्के, तर केंद्र शासनाच्या ६० टक्के अनुदानातून शेतीचा खर्च करण्यात येणार आहे. उत्पादनातून खर्च वजा करता १० टक्के हिस्सा ग्रामसभेकडे जमा होईल व उर्वरित रक्कम व्यक्तीगत कामानुसार प्रत्येकाला मिळेल. रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात गटशेती करण्यात येणार असून, या उपक्रमाचा व्यक्ती व गावाला फायदा झाल्यास हा उपक्रम सतत सुरु ठेवू, असा निर्धार गावकऱ्यांनी केला.

या गटशेतीच्या माध्यमातून कृषी प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया व विपणन, शेतीपूरक व्यवसाय, पशुधन, गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस, कांदाचाळ इत्यादी बाबीही पुढे गावात दृष्टीपथास येणार आहेत.

मेंढा(लेखा) हे गाव सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे, तसेच निस्तार हक्क, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व बांबू विक्री व अन्य विधायक कामांसाठी आधीच प्रकाशझोतात आले आहे. आता त्यात विषमुक्त गटशेतीची भर घालण्यात येणार असल्याने पुन्हा हे गाव अभ्यासकांना खुणावण्यासाठी सज्ज झाले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1MCB9
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना