शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

कुरखेडा नगरपंचायत: शिवसेनेकडे दोन, तर भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी एक सभापतिपद

Saturday, 1st December 2018 12:26:27 PM

कुरखेडा, ता.१: स्थानिक नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतिपदाकरिता आज झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला दोन, तर काँग्रेस व सत्तारूढ भाजपकडे प्रत्येकी एक पद मिळाले.

नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी नगरपंचायतच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपाध्यक्ष कोणत्या विषय समितीचे सभापती राहतील, याची निवड करण्यात आली. यावेळी सत्तारूढ भाजपने केलेल्या बांधकाम समितीच्या मागणीवर मतदान घेण्यात आले असता सत्तारूढ गटाच्या ९ व कांग्रेसच्या एका नगरसेविकेने हात उंचावून मतदान केल्याने १० विरुद्ध ८ अशा मताधिक्याने भाजपने बांधकाम समितीच्या सभापतिपदावर कब्जा केला.

उपाध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापतिपद आले. पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी चित्रा गजभिये, तर कांग्रेसचे मनोज सिडाम यांची आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदावर दुसऱ्यांदा वर्णी लागली.

बांधकाम समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी उपाध्यक्षा कांग्रेसच्या नगरसेविका जयश्री धाबेकर यांनी सत्तारूढ भाजपच्या बाजूने मतदान केल्याने सभागृहाबाहेर कांग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकामध्ये जोरदार खडाजंगी पहावयास मिळाली. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही गटांकडून गुलाल उधळून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.  याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा सचिव विलास गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, तालुकाप्रमुख आशिष काळे, कांग्रेस नेते तथा माजी जिप उपाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष जयंत हरडे प्रामुख्याने उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
44010
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना