बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने

Saturday, 1st December 2018 02:46:01 AM

गडचिरोली, ता.१: रविवारपासून(ता.२)सुरु होणाऱ्या पीएलजीए सप्ताहाच्या दोन दिवस आधीपासून नक्षल्यांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली असून काल(ता.३०)रात्री एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने जाळून टाकली. या वाहनांमध्ये १० जेसीबी, ३ ट्रॅक्टर्स, २ मोटारसायकली व १ पिकअप वाहनाचा समावेश आहे.

काल रात्री सशस्त्र नक्षली काम सुरु असलेल्या ठिकाणी हालेवारा गावाजळ गेले. त्यांनी मजुरांना धमकावून व बराच वेळ ओलिस ठेवून वाहनांची डिझेल टँक फोडली व नंतर वाहनांना आग लावली. आज भल्या सकाळी मजुरांची सुटका केल्यानंतर ही घटना उजेडात आली. मुख्यमंत्री सडक योजनेतून वट्टेपल्ली-गटेपल्ली रस्त्याचे काम सुरु असून, ग्रामसेवकपदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व अल्पावधीतच मोठा कंत्राटदार झालेल्या एका व्यक्तीच्या साळ्याचे व अन्य दोघांचे हे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. २ तारखेपासून सप्ताह सुरु होणार असल्याची कल्पना असतानाही कंत्राटदारांनी काम सुरु ठेवल्याने नक्षल्यांनी आपला डाव साधला. यामुळे वाहनमालकांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी नक्षलवादी २ ते  ८ डिसेंबरपर्यंत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान ते विध्वंसक कारवाया करतात. यावेळी सप्ताहापूर्वीच त्यांनी १६ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकून आपली दहशत निर्माण केली आहे.

अलिकडेच जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना यास नक्षल्यांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव बनविले आहे. गगन्ना हा नक्षल्यांचा मिलिटरी कमांड असल्याने हिंसाचार करण्यावर त्याचा अधिक भर आहे. त्याच्या नियुक्तीनंतर विध्वंसक कारवाया मोठ्या प्रमाणावर होतील, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात खरा ठरला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
91UTU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना