गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास २५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 29th November 2018 06:15:54 AM

गडचिरोली, ता.२९: घरी कुणी नसताना स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा देसाईगंज येथील रहिवासी आहे.

ही घटना आहे १२ नोव्हेंबर २०१७ ची. या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीडित मुलीची आई आठवडी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेली होती. यावेळी मुलीच्या वडिलाने आपल्या मुलाला पेट्रोल घेण्यासाठी पाठविले. त्यावेळी त्याची मुलगी घरी भांडी घासत होती. यावेळी त्याने मुलीला स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने तिला आपबिती सांगितली. त्यानंतर दोघींनीही देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सारिका गुरुकर यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादी व अन्य साक्षदारांचे बयाण आणि वैद्यकीय अहवाल  तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ३७७ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व १० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने पारित केला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4R4QP
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना