शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

जहाल नक्षली नंबाला केशव रावकडे देशातील नक्षल चळवळीचे प्रमुखपद

Thursday, 29th November 2018 01:53:48 PM

गडचिरोली, ता.२९: देशातील नक्षल चळवळ चालविणाऱ्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली आहे. नंबाला केशव राव हा अतिशय आक्रमक असल्याने आगामी काळात हिंसाचार बळावण्याची शक्यता लक्षात घेऊन नक्षलग्रस्त राज्यातील पोलिस व गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडे भाकप(माओवादी)च्या महासचिवपदाची सूत्रे होती. गणपतीने अतिशय आक्रमकरित्या देशाच्या विविध राज्यांमध्ये नक्षल चळवळीचा विस्तार केला. कोंडापल्ली सीतारामय्या यांच्या वार्धक्यानंतर १९९२ मध्ये गणपतीला महासचिव बनविण्यात आले. सलग २५ वर्षे महासचिवपदाची, तर १८ वर्षे पॉलिट ब्युरो सदस्यपदाची सूत्रे सांभाळणारा गणपती हा तब्बल २७ वर्षांपेक्षा अधिक काळ केंद्रीय समितीत कार्यरत होता. परंतु नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात भाकप(माओवादी)च्या केंद्रीय समितीच्या पाचव्या बैठकीत नंबाला केशव राव याच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याने वयाची सत्तरी ओलांडल्याने व प्रकृती पूर्वीसारखी साथ देत नसल्याने तो महासचिवपद सोडणार असल्याची चर्चा दोन वर्षांपासून सुरु होती. अखेर केंद्रीय समितीकडे त्याने आपली इच्छा बोलून दाखवत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नंबाला केशव राव याच्याकडे महासचिवपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

कोण आहे नंबाला केशव राव?

आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेठ येथील मूळ रहिवासी असलेला ६४ वर्षीय नंबाला केशव राव याने वारंगळ येथील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले आहे. नंबाला केशव हा मागील २७ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय आहे. त्याच्यावर विविध राज्यांनी एक कोटीहून अधिक बक्षिसे ठेवली आहेत. नंबाला केशव राव हा गणपतीचा जुना सहकारी आहे. सध्या तो केंद्रीय मिलिटरी कमांडचा प्रमुख म्हणून काम करीत आहे. हिंसक कारवाया करण्यात तो तरबेज आहे. गेल्या काही वर्षांत छत्तीसगडमध्ये ज्या मोठ्या हिंसक कारवाया झाल्या; त्यांचा मास्टर माईंड नंबाला उर्फ गगन्ना हाच असल्याचे सांगितले जाते. नंबाला केशव राव हा गगन्ना, प्रकाश, कृष्णा, विजय, केशव,बसवाराजू इत्यादी नावांनी नक्षल चळवळीत ओळखला जातो.केंद्रीय समिती सदस्य, पीबीएम, इन्चार्ज ऑफ सीएमसी(सेंट्रल मिलिटरी कमिशन) व सीआरबी (सेंट्रल रिजनल ब्युरो) या पदांवर तो सध्या कार्यरत असून, एके-४७ हे शस्त्र जवळ बाळगतो. त्याच्या नियुक्तीमुळे नक्षलग्रस्त भागात पुन्हा हिंसाचार वाढण्याची शक्यता असल्याने गुप्तचर यंत्रणांनी कान टवकारले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Y19CI
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना