बुधवार, 19 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करा;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू-ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा             प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी-गडचिरोली प्रेसक्लबचा निर्णय, ६ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान             जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप, जनजीवन विस्कळीत             शेतकरी कामगार पक्ष फेब्रुवारीत गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद-अलिबाग येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल धामोडे
जिल्हा प्रतिनिधी, दै. देशोन्नती, गडचिरोली
वाढदिवस : 19 डिसेम्बर
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

ब्रिटीशकालीन सिरोंचाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पणतू पोहचले ग्लासफोर्डपेठात

Thursday, 29th November 2018 06:31:58 AM

सिरोंचा, ता.२९: ब्रिटीशकालिन ईस्ट इंडिया कंपनीच्या सिरोंचा व बस्तर क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या चार्ज हेल्मेट ग्लासफोर्ड यांच्या तीन पणतूंनी काल(ता.२८) सिरोंचा व ग्लासफोर्डपेठा येथे भेट दिली.

चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड हे १८५२ ते १८६२ अशी दहा वर्षे तत्लालिन सिरोंचा व बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्याच नावाने सिरोंचा तालुक्यातील एका गावाचे ग्लासफोर्डपेठा असे नाव पडले आहे. त्याची आठवण साठविण्यासाठी ग्लासफोर्ड यांचे पणतू फिटर ग्लासफोर्ड(८७), सुजन ग्लासफोर्ड(८३) व जेनिफर हनमोल्ड(७७) हे काल आस्ट्रेलियावरून बामणी जवळील ग्लासफोर्डपेठा या गावात आले. त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

यानंतर तिन्ही पणतूंनी सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला भेट दिली.चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड हे आपल्या वयाच्या १८ व्या वर्षी सिरोंचात आल्याचे त्यांनी सांगितले.

ग्लासफोर्ड यांनी स्वतः २० डायरी लिहिल्या असून, एका पुस्तकात त्यांनी ग्लासफोर्डपेठा, सिरोंचा व बस्तरबाबत माहिती लिहून ठेवली आहे. त्या माहितीच्या आधारे आज आम्ही आस्ट्रेलियावरून सिरोंचात आल्याचे त्यांनी गाईडला सांगितले. 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लमवार, नागपूर येथून ग्लासफोर्ड यांच्यासमवेत आलेले गाईड हिमांशू, ग्लासफर्डपेठा येथील देवाजी मेडी, माजी उपसरपंच व्यंकटस्वामी कारसपल्ली उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात ब्रिटिशांचे साम्राज्य होते. त्यात सिरोचाला विशेष महत्व होते. आजही सिरोंचात ब्रिटिशांनी बांधलेल्या ऐतिहासिक विश्रामगृहासह, तहसील कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदारांचे निवासस्थान, पोलिस ठाण्याची इमारत इत्यादी वास्तु डौलाने उभ्या आहेत. तत्कालिन मद्रास प्रांतात सिरोंचा हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते. तत्पूर्वी या भागावार १८०० ते १८५० या काळात ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन होते. त्यावेळी बस्तर विभागात सिरोंचाचा समावेश होता. सिरोंचा आणि बस्तरचे जिल्हाधिकारी म्हणून १८५२ ते १८६२ या कालावधीत चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड हे कार्यरत होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TI0S9
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना