शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

'खड्डेमुक्त महाराष्ट्र' योजनेचा फज्जा: काँग्रेसने केला खड्ड्यांमधून जाणाऱ्या वाहनचालकांचा सत्कार

Wednesday, 28th November 2018 06:50:51 AM

गडचिरोली, ता.२८: 'खड्डेमुक्त महाराष्ट्र' या राज्य शासनाच्या संकल्पनेचा फज्जा उडाल्याचा आरोप करीत आज काँग्रेसने युवा नेते डॉ.नितीन कोडवते यांच्या नेतृत्वात चामोर्शी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमधून वाट काढत वाहन चालविणाऱ्यांचा हारतुरे देऊन सत्कार केला.

राज्य शासनाने खड्डेमुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा केली खरी; परंतु जिल्ह्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याचा निषेध करीत आज काँग्रेसचे युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते चामोर्शी मार्गावरील गोंविंदपूर येथे पोहचले. यावेळी त्यांनी कार, मोटारसायकल, ट्रक, बस, ट्रॅक्टर व इतर वाहन चालकांचा हार घालून व गुलाबांचे फुल देऊन सत्कार केला. 

८ तालुक्यांमध्ये नागरिकांना गडचिरोली-चामोर्शी मार्गाने जावे लागते. परंतु रस्ता खराब झाल्याने कित्येक गाड्यांचे चेंबर्स या मार्गावरुन प्रवास करताना फुटले आहेत. वाहन धारकांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त अपघात याच मार्गावर होत आहेत. पालकमंत्र्यांनासुद्धा अहेरीला जाण्याकरिता याच मार्गाने प्रवास करावा लागतो. स्थानिक आमदारसुद्धा चामोर्शीचे असून तेही या मार्गाने रोज प्रवास करतात. खासदारसुद्धा अहेरी, सिरोंचा व अन्य तालुक्यांमध्ये जातांना याच मार्गाने ये-जा करतात.  परंतु या मार्गावर असलेलं खड्डे त्यांना दिसून येत नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेऊनसुद्धा जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी रस्त्यांचे प्रश्न मांडताना दिसत नाही. फक्त रस्त्यावर उभे राहून फोटो काढण्यात ते व्यस्त आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उदघाटन, समारंभ करीत आहेत. मात्र रस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांनी केला. 

याप्रसंगी युवक काँग्रेसचे माजी सचिव कुणाल पेंदोरकर, पंकज बारसिंगे, वशीम शेख, भावेश नागोसे, निखिल खोब्रागडे, दिलीप भांडेकर, नंदू भांडेकर, विलास मेश्राम, प्रकाश नैताम, रवींद्र मोहूर्ले, निखिल पुण्यप्रेडीवार, चोखाजी बांबोळे, चोखाजी भांडेकर, नरेश करंदीकुरवार, तुषार मडावी, स्वप्नील घोसे, प्रीतम गोहणे, अरविंद भोपये, देविदास भांडेकर, धर्मदेव मेश्राम, नितेश्वर मेश्राम, मोहन मेश्राम, नीतेश सुत्रपवार, गुरुदास भांडेकर, तुळशीदास पिपरे, गिरीधर कुनघाडकर, नेताजी कुनघाडकर, विलास पिपरे, विजय सातपुते, ईश्वर देवतळे, गणपत मेश्राम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7GKY0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना