गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

ओबीसींचा आक्रोश रस्त्यावर: 'शेकाप'च्या नेतृत्वात गडचिरोलीसह ठिकठिकाणी केला चक्काजाम

Wednesday, 28th November 2018 03:28:39 AM

गडचिरोली, ता.२८: ओबीसींचे आरक्षण, शेतकरी व ढिवर समाजाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी गडचिरोली व चामोर्शी शहरांसह विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये चक्काजाम आंदोलन केले. यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

ओबीसींचे ६ टक्क्यांवर आणलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, धानाला प्रतिक्विंटल ३५०० रुपये भाव द्यावा, ढिवर समाजाला माजी मालगुजारी तलाव बोड्यांमध्ये मासेमारी करण्याचे पारंपरिक हक्क प्रदान करावे आणि धान व कापूस पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

गडचिरोली: येथे इंदिरा गांधी चौकात शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, पुरोगामी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना चुधरी, तालुका चिटणीस सुधाकर आभारे, रोशन नरुले, दिनेश बोरकुटे, श्यामसुंदर उराडे, श्रीधर मेश्राम यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजया मेश्राम, पुष्पा चापले, सुनीता आलेवार, गीता बोबाटे, शेवंतार्बाइ नैताम, शीला टिकले, मालू नैताम, शेवंता भांडेकर, सुषमा मडावी, ज्योत्स्ना कुकुडकर, ललीता नैताम, छाया नैताम, ललीता मानकर, अनुसया भोयर, योगीता कोरेले, गीता मानकर, सुनीता पवार, पार्वती पवनकर, पुष्पा कोतवालीवाले, प्रियंका कुमरे, शोभा मेश्राम, क्षीरसागर मानकर, लता नैताम, आशा बावणे, वसुंधरा कोडापे, योगीता भोयर, ऐश्वर्या बावणे, सुरेंद्र इष्टाम, आकाश आत्राम, अजित नरोटे, गुरुदेव मडावी, कृष्णा मानकर, महेश गहाणे, गोविंदा कोडाप, नागोराव नंदेश्वर, चमरु कोटामी, योगेश चापले, विजय मेश्राम, गणेश आळेकर, जनार्धन चापले, विनोद मेश्राम, कवडू चापले, हेमंत मानकर, ज्ञानेश्वर निंबोळकर, नेताजी चापले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामुळे बराच वेळपर्यंत चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये भरुन पोलिस नेले. तेथे त्यांना बराच वेळपर्यंत स्थानबद्ध करुन ठेवण्यात आले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पोर्ला: येथे युवा कार्यकर्ते होमराज उपासे यांच्या नेतृत्वात मंगेश भानारकर, विकास झोडगे, रवींद्र येमगेलवार, रमेश भोयर, चेतन मेश्राम, विशाल भोयर, गणेश दाणे, सूरज चापले, सुधीर राऊत, मंगेश निकुरे, श्रीकांत गेडाम, रवींद्र सेलोटे, पुनित उपासे, मंगेश आखाडे, देविदास चापले, कुंदन मामीडवार, बालाजी भोयर, भूपेंद्र तुमडे, यादव शिवणकर, सचिन राऊत, राकेश नागापुरे, सोमेश्वर अम्मावार, रमेश भोयर, सुरेश तुमडे, सुधीर सेलोटे, संतोष कोटांगले, संतोष गेडाम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नागपूर-गडचिरोली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

नगरी: गडचिरोली-नागपूर मार्गावरील नगरी फाट्यावर येथे शेकापचे आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, माजी सरपंच मोरेश्वर बांबोळे यांच्या नेतृत्वात योगेश कोटांगले, दिलीप सातपुते, नामदेव मेश्राम, सुरेश थोरात, राजू नैताम, मनोहर राऊत, प्रभाकर बांगरे, किशोर गडपल्लीवार, निखिल बांबोळे, महेश म्हशाखेत्री, नरेश बारसागडे यांनी सुमारे तासभर चक्काजाम केला.

भेंडाळा: येथे चामोर्शी-मुल मार्गावरील भेंडाळा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रमेश चौखुंडे, दुर्वास म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झालेच पाहिजे, धानाला ३५०० रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, अशा घोषणा देऊन चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात भेंडाळा, सगणापूर, रामाळा, घारगाव, एकोडी, दोटकुली इत्यादी गावांतील कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. यात रतन म्हशाखेत्री, प्रमोद गोर्लावार, गुड्डू सहारे, संजीव अड्डूरवार, किशोर डांगे, राजू केळझरकर, चरणदास सेलोटे, नरेश चौखुंडे, किशोर चुधरी, मंगेश मंगर, राहुल झाडे, मनोज मंगर, विठ्ठल भगत, योगेश आभारे, प्रभुदास पाल, भालचंद्र सयाम, भाऊराव पाल, रुपेश राऊत, सुनील धोटे, यादव मंगर यांचा समावेश होता.

चामोर्शी: येथील हत्तीगेटजवळ शेकापचे तालुका चिटणीस दिनेश चुधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनराज वासेकर, राजेंद्र धोडरे, प्रदीप गुरनुले, गंगाधर थोरात, रंगुदास पाल, भालचंद्र सयाम, चरणदास सेलोटे, योगेश चौखुंडे, गजानन पोरटे, प्रदीप भाकरे, प्रदीप आभारे, बाळू दहेलकर, आनंदराव लोंढे, मिननाथ उरकुडे, मंगेश मंगर, राहुल झाडे, किशोर चुधरी, संजय अड्डूरवार, मुखरु बावणे, दिवाकर भोयर, आशिष खोब्रागडे, बाळू उंदिरवाडे, मनोज पोरटे, योगेश आभारे, किशोर डांगे, शंकर झाडे, यादव मंगर, राजू केळझरकर, नरेश चौखुंडे, सुनील कार्लेवार, वसंत गव्हारे, अजय यासलवार, विलास भोगावार, संतोष बुरांडे, अनिल येनगंटीवार, आशिष कालेश्वरवार, मिलन दुबे, संतोष चिचघरे, रोशन नैताम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामुळे चामोर्शीकडून गडचिरोली व अहेरी आणि मूलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

कुनघाडा: येथे शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम व विठ्ठल दुधबळे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी बैलगाड्या आडव्या करुन रस्ता रोखून धरला होता. या आंदोलनात अरुण किरमे, विलास कोसमशिले, पांडुरंग गव्हारे, आनंदराव उडाण, अरुण वासेकर, अविनाश जुवारे, अमोल चलाख, उमाजी मेश्राम, गणेश कुनघाडकर, दिवाकर खोबे, सोमेश्वर खांडेकर, पुरुषोत्तम खांडेकर, बाळू भोयर सहभागी झाले होते. तहसीलदार श्री.बावणे व नायब तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली. ओबीसी व शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनाला तत्काळ कळवू, असे आश्वासन श्री.बावणे यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

शिवणी: चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे शेकापचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, शेकापचे सर्कल खजिनदास दत्तू चौधरी यांच्या नेतृत्वात बाजीराव कांबळे, रवींद्र देशमुख, नानाजी चुधरी, सरपंच शीला कन्नाके, उपसरपंच घनश्याम गुरनुले, कवडू मुनघाटे, सुमन मेश्राम, भागरथा चौके, लता चापळे, किशोर गेडाम, किशोर गुरनुले, राजू मेश्राम, गजानन गेडाम, नामदेव चौधरी, शिवराम मेश्राम, पत्रू गावतुरे, लोमेश चुधरी, अरुण कुद्रपवार, किरण कांबळे, आनंदराव कुद्रपवार, शालिकराव चुधरी, सुधाकर चापले, भक्तदास कावळे, बाजीराव गुरनुले यांनी आंदोलन केले.

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विनायक निमसरकार,  रवी वनकर, प्रणय धोटे, सुरेश भडके, अजय वनकर, विकास शेडमाके, सूरज शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करुन आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-अहेरी व आष्टी-चामोर्शी मार्ग रोखून धरला. 

अनखोडा: येथे प्रेम कोसनकर यांच्या नेतृत्वात नागेश वाट, मंतेश निमसरकार, नरेश उराडे, राकेश नागापुरे, प्रदीप दुर्गमवार, रवी वनकर, अंकित गेडाम, नेताजी येलेकर, अमित  वाकडे, सोनू धानोरकर, जयंत निमसरकार, ढाढू बोरकुटे, राजेश दुर्गमवार, हिरामण उराडे, पत्रू वनकर, अजय वनकर, रतन निमगडे, बंडू धोटे, योहान धोटे, दशरथ भडके, सुरेश भडके, साहिल भडके, विलास शेडमाके, विकास शेडमाके, सूरज शिंदे, अजय शिंदे, संतोष रोहनकर, नितीन धानोरकर, पंकज वाकडे, जितेंद्र झाडे आदींनी सहभाग घेतला. 

गुरवळा: येथे शेकापचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश मंटकवार, तालुका सदस्य चंद्रकांत भोयर यांच्या नेतृत्वात धनराज भोपये, विनोद मेश्राम, रोशन भोयर, राकेश मेश्राम, अजय साखरे, मयूर मेश्राम, सूरज चिचघरे, अनिल पोवनवार, महेश मेश्राम, नीरज चिचघरे, गजानन अडेंगवार, डंबाजी भोयर,नानाजी गेडाम, देवनाथ मेश्राम, रोशन मेश्राम, ईश्वर फापनवाडे, नरेश तुंकलवार, गोपाळा कोमलवार यांनी तब्बल ३ तास चक्काजाम करुन वाहतूक रोखून धरली.

विश्रामपूर: गडचिरोली-धानोरा मार्गावरील विश्रामपूर फाट्यावर भिकारमौशी, कळमटोला, बाम्हणी, आंबेटोला, उसेगाव, बोदली, मेंढा येथील नागरिकांनी सर्कल चिटणीस रोशन नरुले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. या आंदोलनात सचिन निलेकार, सुभाष सोनटक्के, दीपक आवारी, विनोद नरुले, अमोल मेश्राम, गणेश गेडाम, चंद्रकांत नरुले, सुरेश निकुरे, विलास मेश्राम, योगेंद्र निलेकार, पंढरी गुरनुले, वसंत खेवले, श्रावण गुरनुले, जनार्धन आवारी, मधुकर गुरनुले, किशोर राऊत, दिवाकर गुरनुले, जीवन मेश्राम, लंकेश सेलोटे, किशोर वेलादी, कुमोद खेवले, लोमेश सेलोटे, दत्तू सेलोटे, गुरुदेव येलमुले, चंद्रभान पोटावी, गुरुदेव सेलोटे, यादव बावणे, विलास कोलते, लाला मडावी, खुशाल मुरतेली, सोमाजी करकाडे, केशव मडावी, नागेश्वर नंदेश्वर, गोविंद कोडाप, भजन ढवळे, हिवराज उंदिरवाडे, वसंत खेवले यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

जांभळी: चातगाव-कारवाफा मार्गावरील जांभळी येथे शेकापचे सर्कल चिटणीस वसंत लोहट यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात अनिल लोहंबरे, बालाजी राऊत, महेश राऊत, सुनील लोहट, यशपाल नेवारे, हेमंत सरवर, महेश लोहट, छत्रपती राऊत, तेजेश्वर लोहारे, सुरेश राऊत, हरिदास राऊत, गजानन राऊत, भास्कर चांभारे, अमर राऊत, अजय नेवारे, तेजेश्वर नेवारे, शामराव सरवर यांच्यासह अनेक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करुन ओबीसी आरक्षण, धानाला हमीभाव व ढिवर समाजाला तलाव व बोड्यांचे पारंपरिक हक्क मिळण्यासाठी आवाज बुलंद केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
USLVS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना