बुधवार, 19 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करा;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू-ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा             प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी-गडचिरोली प्रेसक्लबचा निर्णय, ६ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान             जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप, जनजीवन विस्कळीत             शेतकरी कामगार पक्ष फेब्रुवारीत गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद-अलिबाग येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल धामोडे
जिल्हा प्रतिनिधी, दै. देशोन्नती, गडचिरोली
वाढदिवस : 19 डिसेम्बर
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

४० ग्रामसभांमधील आदिवासींनी एकत्र येऊन कटेझरीत साजरा केला संविधान दिवस

Tuesday, 27th November 2018 12:34:46 PM

धानोरा, ता.२७: संपूर्ण देश संविधान दिवस साजरा करीत असताना आदिवासीबहुल गावांतील माणूसही मागे राहिला नाही. मुलभूत सुविधांचा अभाव असलेल्या कटेझरी क्रमांक २ या अतिदुर्गम गावातील आदिवासींनी संविधान दिवस साजरा करुन बाबासाहेबांप्रती आपले ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमाजी कोल्हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वनाधिकारी श्री.गेडाम, 'गावकल्याणकारी संस्था खुटगाव'चे उपाध्यक्ष गणपत कोल्हे, संस्थेचे सदस्य गंगाराम आचला उशीरपार, वासुदेव आचला मुंजालगोंदी, श्री.कल्लो झेंडेपार, भारतसाय कुंजाम आलोंडी, भगतसिंग तुलावी देवसूर, नांगसु गावळे गुरेकसा उपस्थित होते. याशिवाय प्रत्येक गावातील गाव पाटील, भूमिया, ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांनी भारतीय संविधानाचे महत्व विशद करुन बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. मुरूमगाव इलाख्यातील तब्बल ४० ग्रामसभांमधील लोकांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला. 

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
41476
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना