गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

शेतकरी व ओबीसींच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबरला शेकापचे चक्काजाम आंदोलन

Monday, 26th November 2018 01:28:38 AM

गडचिरोली, ता.२६: ओबीसींचे आरक्षण, शेतकरी व ढिवर समाजाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी २८ नोव्हेंबरला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपरोक्त इशारा दिला आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, धानाला प्रतिक्विंटल ३५०० रुपये भाव द्यावा, ढिवर समाजाला माजी मालगुजारी तलाव बोड्यांमध्ये मासेमारी करण्याचे पारंपरिक हक्क प्रदान करावे आणि धान व कापूस पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा इत्यादी मागण्यांचे निवेदन शेकापसह विविध संघटनांनी वेळोवेळी शासनाला दिले आहे. परंतु शासनाने या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी २८ नोव्हेंबरला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतल्याची माहिती रामदास जराते यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4VVXK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना