शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

Monday, 19th November 2018 02:24:05 PM

गडचिरोली, ता.१९: धानोरा व कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिला असून, एकीची ओळख पटली आहे. बबिता नरसू गावडे उर्फ शांताबाई बारसू नैताम(२८) रा.फुलकोडो, ता.धानोरा असे तिचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सी-६० पथकाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. या पथकासमवेत पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारीही होते. दरम्यान आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. पोलिसांना घटनास्थळावर दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले असून, ते ताब्यात घेतले आहेत. नक्षल्यांची शस्त्रे व काही दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांना मिळाले आहे. मृतांमध्ये दोन्ही महिला असून, त्यापैकी एका महिला नक्षलीची ओळख पटली आहे. बबिता नरसू गावडे उर्फ शांताबाई बारसू नैताम(२८) रा.फुलकोडो, ता.धानोरा असे तिचे आहे. बबिता ही प्लाटून क्रमांक १५ व टिपागड दलमची सदस्य होती. तिच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये १६ गुन्हे दाखल असून, शासनाने तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दुपारी दोघींचेही मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले.

अजूनही त्या भागात नक्षलविरोधी अभियान सुरुच आहे.मृत नक्षल्यांची संख्या वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JPZ79
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना