मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने कँसरग्रस्तास मिळाली १ लाखाची मदत

Friday, 16th November 2018 07:23:46 AM

कुरखेडा, ता.१६: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने कुरखेडा तालुक्यातील मोहगाव येथील सिद्धार्थ धोंडणे या कँसरग्रस्त इसमास मुख्यमंत्री निधीतून सुमारे १ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे सिद्धार्थला उपचारासाठी मोठा आधार मिळाला आहे.

अलिकडे कँसरग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या जीवघेण्या आजाराचे उपचार करताना गरीब माणूस पूर्ण खचून जातो. मात्र, अशा गरजू व्यक्तींना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून भरीव आर्थिक मदत केली जाते. यामुळे रुग्णाचा बराच भार हलका होतो. मोहगाव येथील सिद्धार्थ धोंडणे यांनाही कँसर या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यांना मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलने वैद्यकीय उपचार सुचविले होते. त्यासाठी २ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु धोंडणे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा मोठा खर्च झेपणे शक्य नव्हते. त्यामुळे धोंडणे यांनी आपली व्यथा आ.कृष्णा गजबे यांना सांगितली. लागलीच श्री.गजबे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचे आश्वस्त केले. 

आ.गजबे यांनी पाठपुरावा केल्यानंतर १ लाख रुपयांचा निधी उपचारासाठी मंजूर झाला. हा निधी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला वळती करण्यात आला. यासंबंधीचे पत्र आ.गजबे यांनी नुकतेच सिद्धार्थ धोंडणे यांचे पुत्र आकाश धोंडणे यांना सुपूर्द केले. याप्रसंगी सिनेट सदस्य चांगदेव फाये उपस्थित होते. कँसरसारख्या दुर्धर आजाराशी लढण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिल्याबद्दल सिद्धार्थ धोंडणे यांनी आ.कृष्णा गजबे यांचे आभार मानले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CJ085
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना