बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जनता दरबारात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा: खासदार अशोक नेते

Friday, 16th November 2018 06:38:31 AM

मुलचेरा, ता.१६: जनता तक्रार दरबारात अनेक नागरिक व शेतकरी आपापल्या अडचणी व समस्या सांगतात. 

त्यांच्या समस्यांची दखल घेऊन कांमे तातडीने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. मूलचेरा येथे आयोजित जनता तक्रार दरबारात ते बोलत होते.

यावेळी भाजपचे लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी.के. मेश्राम, जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, महिला आघाडीच्या मूलचेरा तालुका अध्यक्ष तथा सरपंच ममता बिश्वास, सामाजिक कार्यकर्ते उरेते, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते. भाजपचे तालुका महामंत्री निखिल हलधर, मारुती पेंदाम, बंगाली आघाडीचे विधान बैध्य, उपाध्यक्ष अशोक बडाल, सचिव मारुती कोहळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय बिश्वास, कोषाध्यक्ष शंकर दास, खोकन पाल यांच्यासह भाजप व बंगाली आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जनता तक्रार दरबारात सर्व विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, नागरिक, महिला तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, चेन्ना प्रकल्प त्वरित सुरु करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात यावी, तालुक्यातील रस्ते व पुलाची कामे तत्काळ मार्गी लावावी, मुद्रा लोन व इतर बँक सुविधा तसेच विमा योजनेचा लाभ नागरिकांना तत्काळ देण्यात यावा, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नागरिकांना दर महिन्याला देण्यात यावा, वन जमिनी साठी ७५ वर्षांची अट शिथिल करण्यात यावी,इत्यादी मागण्या नागरिकांनी जनता तक्रार दरबारात मांडल्या.यावेळी खासदार अशोक नेते यांनी सर्व प्रश्न, अडचणी जाणून घेऊन ते तत्काळ सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व विभाग प्रमुखांना दिल्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NXP5E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना