मंगळवार, 21 मे 2019
लक्षवेधी :
  कुरखेडा तालुक्यात दोन ठिकाणी अपघात-वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ८, तर मोटारसायकल अपघातात दोघे जखमी             धान भरडाई करण्यास मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश             नक्षल्यांच्या जिल्हा बंदला हिंसक वळण, कुरखेडा व एटापल्ली तालुक्यात लाकडी बिट जाळले, भामरागडमध्ये रोड रोलरची जाळपोळ, अनेक ठिकाणी बॅनर लावून रस्त्यांची अडवणूक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार

Friday, 16th November 2018 01:13:49 PM

कुरखेडा, ता.१६: अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल(ता.१५) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कोरची मार्गावरील पुराडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर घडली. पंकज नरोटे(२१) व  यशवंत किरंगे(३२) दोघेही रा.डोंगरगाव, ता.कुरखेडा अशी मृतकांची नावे आहेत.

पंकज व यशवंत दोघेही मोटारसायकलने पुराडावरून डोंगरगावला जात असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पुराडापासून दीड किलोमीटर अंतरावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. पुराडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार उमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1130A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना