मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पुराडा आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा केव्हा मिळणार?

Thursday, 15th November 2018 05:15:12 AM

कुरखेडा, ता.१५: तालुक्यातील पुराडा येथील आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला असून, या प्रस्तावाची अंमलबजावणी कधी होणार, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

पुराडा पथकामध्ये परिसरातील नऊ ग्रामपंचायतीचा समावेश असून, सुमारे २० हजार लोकसंख्या आहे. त्यात ३० अंगणवाड्या समाविष्ट आहेत. नवीन प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रासाठी १६ हजार लोकसंख्येचा निकष आहे. पुराडा येथील आरोग्य केंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळण्यासाठी पुराडाचे माजी सरपंच हरिश्‍चंद्र डोंगरवार यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा निवेदने देऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेमार्फत शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्यात आला. शिवाय परिसरातील ग्रामसभांच्या ठरावांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनेही ठराव मंजूर करून ते मान्यतेसाठी शासनाकडे  पाठविण्यात आले. परंतु सर्व निकषांची पूर्तता करुनदेखील पुराडा आरोग्य पथकाला स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला नाही. याबाबत शासनस्तरावर लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

सद्य:स्थितीत पुराडा आरोग्य केंद्र तालुक्यातील एका टोकावर असलेल्या देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले असून या दोन गावामधीलअंतर 41 किलोमीटर इतके असल्याने प्रशासनिक दृष्ट्या गैरसोयीचे आहे पुराडा आरोग्य पथकाला स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4KN1G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना