गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

धानोऱ्यात देशी दारुसह ६ लाख ८४ हजारांचा ऐवज जप्त

Thursday, 15th November 2018 01:37:25 AM

धानोरा, ता.१५: येथील पोलिसांनी आज भल्या पहाटे ३ लाख ८४ हजारांच्या देशी दारुसह एक पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणातील आरोपी पिंटू मंडल फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना धानोरा शहरापासून पूर्वेस १ किलोमीटर अंतरावरील शिवाराकडून एक वाहन येताना दिसले. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात ३ लाख ८४ हजार रुपये किंमतीच्या रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या ३८ पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी ही दारु व अशोक लेलँड कंपनीचे सीजी १९-बीएच ६३५६ क्रमांकाचे पिकअप वाहन(किंमत ३ लाख ४ हजार रुपये) असा एकूण ६ लाख ८४ हजार रुपयांचा माल जप्त केला. आरोपी पिंटू मंडल फरार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RUQ4I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना