शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गॅरापत्ती-सावरगाव मार्गावर आढळला १५ किलोचा भूसुरुंग

Wednesday, 14th November 2018 06:30:13 AM

धानोरा, ता.१४: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना आज केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनच्या जवानांना गॅरापत्ती-सावरगाव मार्गावरील कनगडी गावाजवळ १५ किलो वजनाची स्फोटके पेरुन ठेवल्याचे आढळून आले. 

आज सकाळी सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियानावर निघाले असता कनगडी गावाजवळ आयईडी स्फोटके पेरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. सीआरपीएफच्या जवानांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांना पाचारण करुन ही स्फोटके बाहेर काढली. त्यात जवळपास १५ किलो स्फोटके त्यात आढळून आली. नंतर ती नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

११३ बटालियनचे कमांडंट एन.शिवशंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमांडंट प्रमोद शिरसाट, निरीक्षक श्री.ननैया, पोलिस उपनिरीक्षक के.डी.ढेरे और पोलिस जवानांनी ही कामगिरी बजावली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ME5UV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना