शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेला जखमी करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास

Tuesday, 13th November 2018 06:49:35 AM

गडचिरोली, ता.१३: वडील व सावत्र मुलीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने वार करुन तिला जखमी करणाऱ्या इसमास जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश रामाजी सिडाम रा. भामरागड असे दोषी इसमाचे नाव आहे. 

आरोपी गणेश रामाजी सिडाम हा त्याची सावत्र मुलगी सुनंदा सिडाम हिच्याशी नेहमी दारु पिऊन भांडण करीत असे. १९ डिसेंबर २००९ रोजी गणेश सिडाम हा सुनंदाला अश्लिल शिवीगाळ करीत होता. त्यावेळी घराशेजारी राहणारी रेखा श्रीहरी धानोरकर याने गणेश हटकले. मात्र, त्याने कुऱ्हाडीने रेखा धानोरकर हिच्यावरच वार केला. डोक्याला जबर इजा झाल्याने रेखा अंगणात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडली. शेजाऱ्यांनी तिला भामरागडच्या सरकारी दवाखान्यात भरती केले. त्यानंतर तिला नागपूरच्या वोक्हार्ट इस्पितळात हलविण्यात आले. तेथे उपचारानंतर तिची सुटी करण्यात आली. पुढे रेखा धानोरकरची मुलगी भाग्यश्री हिने १९ डिसेंबर २००९ रोजी भामरागड पोलिस ठाण्यात आरोपी गणेश सिडाम याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी गणेशवर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा केला. आरोपी गणेश फरार होता. नऊ महिन्यांपूर्वी पोलिसांनी शोध घेऊन त्यास अटक केली. साक्षदारांचे बयाण नोंदविल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षाने रेखा धानोरकर व अन्य साक्षदारांचे बयाण नोंदविले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी गणेश सिडाम यास भादंवि कलम ३०७ अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ACU4S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना