गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Monday, 12th November 2018 05:23:49 AM

कुरखेडा, ता.१२: तालुक्यातील सोनसरी परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम असून, या बिबट्याने सोनसरी येथील एका गोठयात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घोट घेऊन ठार मारल्याची घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. 

पंधरा दिवसापूर्वी सोनसरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधगाव येथील जंगलात या बिबट्याने एका बेचाळीस वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज सोनसरी येथील विजय यशवंत गुरुकर यांच्या गोठयात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घोट घेऊन ठार मारले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे, सोनसरीचे क्षेत्र सहायक चन्नावार, वनरक्षक नन्नावरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VDOFA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना