शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गीताताई बोबाटे यांची शेकापच्या विवेकानंदनगर शाखेच्या चिटणीसपदी नियुक्ती

Sunday, 4th November 2018 06:29:27 AM

गडचिरोली, ता.४: भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी महिला संघटनेच्या विवेकानंदनगर शाखेच्या चिटणीसपदी गीताताई बोबाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा व पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी यांनी त्यांची नियुक्ती केली.

स्थानिक सेमाना देवस्थान परिसरात शेकापच्या पुरोगामी महिला संघटनेद्वारा आयोजित बैठकीत बोबाटे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते होते. यावेळी गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, प्रिया कुमरे, विजया मेश्राम, मंदा आवारी, वंदना बारसागडे, सुनीता आलेवार, पुष्पा कोतवालीवाले, वसुंधरा कोडापे, लता बोदेले प्रामुख्याने उपस्थित होत्या. नियुक्तीबद्दल गीताताई बोबाटे यांचे विवेकानंद नगरातील महिलांनी अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2WVU0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना