शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

पत्रकार प्रल्हाद म्हशाखेत्री गोंडवाना विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग समितीवर

Sunday, 4th November 2018 08:35:50 AM

गडचिरोली, ता.४: येथील ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद म्हशाखेत्री यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी एक पत्र जारी करुन अँटी रॅगिंग समितीवर १३ जणांची निवड केली आहे. त्यात प्रल्हाद म्हशाखेत्री यांचा समावेश आहे. प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. अन्य सदस्यांमध्ये गडचिरोलीचे नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, प्रा.संदीप कागे, प्रा.कु.प्रीती काळे, यशवंत खुळसिंगे, अमितकुमार धोडरे, गायत्री पिपरे, नरेश मुद्रकोळवार, संजीवनी मोडक व सहायक कुलसचिव नरेश झाडे यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल पत्रकार प्रल्हाद म्हशाखेत्री यांचे त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांची रॅगिंग करुन त्यांना वेठीस धरले जाणार नाही, याची खबरदारी समिती घेईल, असे श्री.म्हशाखेत्री यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XCR7C
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना