शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आ.वडेट्टीवारांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Sunday, 4th November 2018 12:59:03 AM

गडचिरोली, ता.४: काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी आज माडेतुकुम व विवेकानंदनगरातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विविध पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माडेतुकुम येथील वसंत मेश्राम, दादाजी कोल्हटकर, प्रफुल्ल कोल्हटकर, रमेश गेडाम, प्रवीण गेडाम, पंकज गेडाम, रामकृष्ण मेश्राम, भाऊराव भांडेकर, परशुराम कुंकलवार, प्रकाश कुंकलवार, तुकाराम लाडे, हिरामण सहारे, विवेकानंदनगर येथील जीवनदास मेश्राम, फिरोज पठाण, राजू मेश्राम, संजय बोटसरे, लालाजी दिवाडे, गिरीधर गगपल्लीवार, नागेंद्र शुद्धावार, स्वप्नील निमगडे, जयदीप चिलबुले, मुकुंदा डोंगरे व प्रकाश बुरांडे यांचा समावेश आहे. आ.वडेट्टीवार यांनी सर्वांचे काँग्रेसचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

याप्रसंगी आ.वडेट्टीवार म्हणाले की, भाजप सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असून, पराभव दिसू लागताच आता राममंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. हिंदू धर्म खतरे में है, असे सांगून साध्याभोळ्या हिंदूना फसवले जात आहे. इंग्रज येण्यापूर्वी भारतावर पाचशे वर्षे मोघलांनी राज्य केले. तेव्हा हिंदू खतरे में नव्हता. मग, आता लोकशाही राज्यात तो कसा धोक्यात आहे, असा सवाल आ.वडेट्टीवार यांनी केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
11I4S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना