बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

प्रा.अंजली आंबेडकर २३ व २४ नोव्हेंबरला गडचिरोलीत

Wednesday, 31st October 2018 12:58:59 AM

गडचिरोली, ता.३१: भारिप बहुजन महासंघाच्या ज्येष्ठ नेत्या तथा अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी प्रा.अंजली आंबेडकर २३ व २४ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हृयाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

प्रा.अंजली आंबेडकर यांचा पक्षबांधणीसाठी राज्यभर जनसंपर्क दौरा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणुन त्या गडचिरोली येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात अंजली आंबेडकर ह्या २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला आघाडीद्वारे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतील व दुसऱ्या दिवशी प्रमुख महिला पदाधिकाऱ्‍यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतील.  

त्यांच्यासोबत भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या प्रदेशच्या पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच महिला, युवक व विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांची संयुक्त सभा नुकतीच घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हा मार्गदर्शक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा.हंसराज बडोले, जिल्हा सरचिटणीस प्रा.राजन बोरकर, पत्रू टेंभुर्णे, प्रा.प्रकाश दुधे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माला भजगवळी, महिला जिल्हा संघटिका सपना रामटेके, उपाध्यक्ष पुणेश्वर दुधे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संदीप रहाटे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, गडचिरोली तालुकाध्यक्ष देवराव जांभुळकर आदी उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N3E89
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना