बुधवार, 19 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करा;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू-ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा             प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी-गडचिरोली प्रेसक्लबचा निर्णय, ६ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान             जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप, जनजीवन विस्कळीत             शेतकरी कामगार पक्ष फेब्रुवारीत गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद-अलिबाग येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल धामोडे
जिल्हा प्रतिनिधी, दै. देशोन्नती, गडचिरोली
वाढदिवस : 19 डिसेम्बर
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

अंगणवाडी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

Monday, 29th October 2018 07:12:29 AM

आरमोरी, ता.२९: शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, दोनशे घरांची लोकवस्ती असलेल्या ठिकाणीदेखील पूर्व प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी, पाळणाघर, वस्तीशाळा उघडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी आवश्यक असलेला माँटेसरी अभ्यासक्रम आरमोरी येथे सुरु करण्यात आला आहे.

बालकांची देखभाल, सुसंस्कार, बालकांचे आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करुन कुटुंब सुसंस्कारित करणे गरजेचे आहे. मुलांचा व स्वत:चा सर्वांगिण विकास करावयाचा असेल तर डिप्लोमा इन नर्सरी टिचर ट्रेनिंग(माँटेसरी)हा अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा असून, आत्मविश्वासाने अध्यापन करता यावे, याचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते.

९ महिने कालावधीच्या नर्सरी इन टिचर ट्रेनिंगमध्ये बाल शिक्षणाची गरज, काळजी, शिक्षण, बालविकास, बालकांची वाढ आणि आरोग्य, म्युझिक, सामाजिक विकास, शाळेतील वाचन आणि शिक्षण, क्लासरुम मॅनेजमेंट, शैक्षणिक प्रक्रिया, शिक्षणाचे नियोजन, मायक्रो टिचिंग, सांस्कृतिक शिक्षण यासारख्या अनेकविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाते.

हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पूर्व प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी, वस्तीशाळा, पर्यवेक्षिका इत्यादी ठिकाण नोकरी मिळविता येते. 

आरमोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ नर्सिंग अँड हेल्थ सायंस या संस्थेने माँटेसरी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केला आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील १० वी, १२ वी उत्तीर्ण महिला व युवतींनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह संस्थेच्या आरमोरी येथील कार्यालयात(बँक ऑफ इंडियाच्या वर, तिसरा मजला, आरमोरी) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत, तसेच ९६२३४५९६३२ व ९४३१७२६७७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा.आनंद वासनिक यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L9U3M
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना