शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पोरेड्डीवार विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर दुसऱ्यांदा करणार नागपूर विभागाचे नेतृत्व

Friday, 26th October 2018 10:46:03 PM

गडचिरोली,ता.२७: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पूणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या विद्यमाने गडचिरोली येथे आयोजित १९ वर्षे वयोगटातील शालेय खो-खो स्पर्धेत चातगाव येथील कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ अव्वल ठरला असून, आता या संघातील खेळाडू धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने काटोल संघाचा पराभव करुन नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावले.

 यानंतर .३ नोव्हेंबर २०१८ रोजी धुळे येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पोरेड्डीवार विद्यालयाचा विजेता संघ नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

 राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. त्यांना शाळेच क्रीडा शिक्षक सुरेश निंबार्ते यांचे मार्गदर्शन लाभले. श्री.निंबार्ते यंदा सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्याचा मानस खेळाडूंनी व्यक्त केला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष सिंधूताई पोरेड्डीवार, सचिव प्राचार्य कविता पोरेड्डीवार, शाळा समिती अध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, प्राचार्य टी.के.बोरकर, जि.प.सदस्य राजू जिवानी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू ठाकरे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेता संघ व क्रीडा शिक्षक सुरेश निंबार्ते आणि नितीन आतला यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L4BTH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना