शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोंडवाना विद्यापीठाच्या जलतरणपटूंची बंगलोरच्या स्पर्धेसाठी निवड

Friday, 26th October 2018 06:13:48 AM

गडचिरोली, ता.२६: बंगलोर येथील जैन विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचे जलतरणपटू निखिल भोयर, संतोष गेडेकर व महेश भोई यांची निवड झाली असून, ते आज बंगलोरला रवाना झाले.

निखिल भोयर ५० मीटर फ्रीस्टाईल, महेश भोई ५० मीटर फ्रीस्टाईल, ३० मीटर बॅकस्ट्रोक व ब्रेस्टस्ट्रोक, तर संतोष गेडेकर हा ५० मीटर फ्रीस्टाईल, बेस्टस्ट्रोक व बटफ्लाय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. गडचिरोली येथील जलतरण तलावाचे व्यवस्थापक योगेश चापले हे संघ व्यवस्थापक म्हणून जलतरणपटूंसमवेत बंगलोरला रवाना झाले आहेत.

प्रा.अनिता लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, रामदास जराते, मुकुंदा भोयर, महेंद्र रामटेके, रोहिदास कुमरे व चाहत्यांनी तिन्ही जलतरणपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
65F3Q
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना