गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

चितळ शिकारप्रकरणी १७ जणांना अटक

Tuesday, 23rd October 2018 06:48:40 AM

गडचिरोली, ता.२३:सामूहिकरित्या चितळाची शिकार करुन त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या शिवणी व हिरापूर येथील तब्बल १७ जणांना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी काल अटक केली.

मनोहर उष्टूजी भोयर, गजानन लक्ष्मण चुधरी, बाजीराव मसाजी कांबळे, जगन्नाथ मसाजी कांबळे, कार्तिक पुरुषोत्तम गेडाम, संतोष मोरेश्वर मेश्राम, आनंद वामन मानकर, धनराज एकनाथ गेडाम, येमाजी एकनाथ गेडाम, ऋषी हना भोयर, अमित राजेंद्र लाटलवार, जीवन दादाजी गेडाम, विनोद गणपत भोयर, योगाजी महादेव गेडाम सर्व रा.शिवणी तसेच पुरुषोत्तम तुकाराम भोयर, सुरेश पत्रूजी गेडाम, हिरामण तडकूजी गेडाम रा.हिरापूर अशी आरोपींची नावे आहेत.

शिवणी व हिरापूर येथील काही नागरिकांनी जंगलात जाळे लावून एका चितळाची शिकार केली. त्याचे मांस गावात आणल्याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक डब्लू.आय.यटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीवरक्षक मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी डी.व्ही.कैलुके यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांनी १७ जणांना अटक केली. वनाधिकाऱ्यांनी आरोपींकडून शिकारीचे जाळे, लोखंडी भाला, कुऱ्हाड, विळा, लाकडी खुंट्या, चितळाचे कच्चे व शिजविलेले मांस, भांडी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय आरोपींनी प.गुरवळा बिट क्रमांक १६६ मधील जंगलात शिकार केलेल्या ठिकाणी चितळाचे फेकून दिलेले कच्चे मांस, तोंड, शिंगे व पाय घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आले. वन्यजीव शिकारप्रकरणी तब्बल १७ आरोपींना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या कारवाईत क्षेत्रसहायक हेमके, जेनेकर, काळे, साखरकर, वनपाल कुंभारे, वनरक्षक कु.मट्टामी, कु.बोरकुटे, कोडापे, चव्हाण, राठोड, ठाकरे, बोढे, कवडो, भसारकर, टोंगे, दुधबळे, कु.दिकोंडावार, शिंदे, कु.डिगे यांचा सहभाग होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
89M45
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना