गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

२३ ऑक्टोबरला आरमोरीत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांचे व्याख्यान

Monday, 22nd October 2018 06:55:08 AM

आरमोरी, ता.२२: येथील प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरमच्या वतीने मंगळवारी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरमोरी येथील महात्मा गांधी चौक, जुनी गुजरी येथे होणार आहे. 'मानव मुक्तीच्या लढ्यातील सेक्युलॅरिझमची भूमिका' हा या परिसंवादाचा विषय असून, ज्येष्ठ साहित्यीक व महाराष्ट्र सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे हे अध्यक्षस्थानी राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी पोलिस उपायुक्त तथा सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य उपाध्यक्ष भरत शेळके, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी बबन चहांदे, सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य संघटक गौतम सांगळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर विजय शेंडे यांचा समाजप्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.अमरदीप मेश्राम, खिरेंद्र बांबोळे, डॉ.प्रदीप खोब्रागडे, भारत शेंडे, कैलास शेंडे, जगदीश मेश्राम, भगवान ठवरे, पुरंदर इंदुरकर, गोपाल ठवरे आदींनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8K253
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना