शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

Tuesday, 16th October 2018 01:38:16 AM

गडचिरोली, ता.१६: कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंबडपार-गुरियालदंड जंगलात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.

विशेष अभियान पथकाचे जवान आज सकाळी कोंबडपार-गुरियालदंड जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युतर देताच नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नक्षल्याचा मृतदेह, एक रायफल व अन्य नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.  मृत नक्षली पुरुष आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S34UA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना