बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

ओबीसींच्या बैठकीत वेगळा राजकीय पर्याय शोधण्याचा निर्णय

Sunday, 14th October 2018 08:03:12 AM

देसाईगंज, ता.१४: काँग्रेसने सत्तेत असताना ओबीसींवर अन्याय केला आणि भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या ओबीसी प्रवर्गातील नागरिक एकटवले असून, त्यांनी एका बैठकीत वेगळा राजकीय पर्याय शोधण्याचे सुतोवाच केले आहे.

तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी समाजातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनपाल मिसार होते. बैठकीला जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, देसाईगंज नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, ओबीसी नेते प्रा.शेषराव येलेकर, रुचित वांढरे, चौधरी, मस्के, पंचायत समिती सदस्या अर्चना ढोरे, विसोराच्या सरपंच मंगला देवढगले, आमगावचे सरपंच योगेश नाकतोडे, सावंगीचे सरपंच राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, चोपचे उपसरपंच कमलेश बारस्कर, शामराव तलमले, नगरसेवक सचिन खरकाटे, राजेंद्र बुल्ले कोरेगाव, प्रभाकर चौधरी, महेश झरकर, लोकमान्य बरडे, गौरव नागपूरकर, सुनील पारधी यांच्यासह चारशे ओबीसी बांधव उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील ओबीसीचे कपात झालेले आरक्षण व अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. आजवरच्या राजकीय पक्षांनी ओबीसींच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करीत या प्रवर्गावर सातत्याने अन्याय केला. भाजपने. निवडणुकीपूर्वी दिलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. त्यामुळे आता सगळे पक्ष एकाच माळेचे मणी असून, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात असलेल्या ओबीसींनी एकत्र येऊन वेगळाच राजकीय पर्याय निवडावा लागेल, असा सूर चर्चेदरम्यान निघाला.  

ओबीसी प्रर्वगाच्या प्रश्नांसंबंधी समाजात जागृती व्हावी, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गावोगावी जनजागृती सभा घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. विविध पक्षांतील ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची दाहकता आपापल्या पक्षनेत्यांच्या लक्षात आणून द्यावी. त्यांनी प्रश्न सोडविला नाही, तर सर्व पक्षातील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी गावपातळीपासुन सामूहिक राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, यावरही बैठकीत विचारमंथन झाली. लवकरच जिल्हा स्तरावर अशी बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विष्णू दुनेदार यांनी मानले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z4KC0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना