बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

काँग्रेसला संजीवनी देत आहे डॉ.नितीन कोडवतेंचा झंझावाती दौरा

Saturday, 13th October 2018 01:25:26 AM

गडचिरोली, ता.१३: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर, डॉ.नितीन कोडवते या 'कोऱ्या आणि करकरीत' युवा नेत्याने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र पिंजून काढल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी निर्माण झाली आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मरगळ आली होती. गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्तेही सुस्त झाले होते. अशातच केंद्र सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केली. त्यासाठी गडचिरोली येथील डॉ.नितीन कोडवते यांचे नाव पुढे आले. पक्ष नेतृत्वाने डॉ.कोडवते यांना 'कामाला लागा' असा आदेश देताच त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. अत्यंत कमी वेळात जवळपास चारशे किलोमीटर दक्षिणोतर लांबीच्या लोकसभा क्षेत्राच्या दोन्ही टोकांपर्यंत ते जाऊन पोहचले. उच्चशिक्षित असल्याचा कुठलाही इगो न बाळगता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. शिवाय त्यांची पाटी कोरी असल्याने नागरिकांकडून त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळू लागला आणि सोशल मीडियावर डॉ.कोडवते यांचीच चर्चा होऊ लागली. परिणामी काँग्रेस कार्यकर्तेही मरगळ झटकून कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी आणखी तीन-चार नेते इच्छूक आहेत. परंतु चार वर्षांत लोकांपर्यंत जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. केवळ १३३ वर्षांची काँग्रेसची परंपरा असल्याचे सांगत ही मंडळी स्वस्थ बसून राहिली. त्यामुळे आता अचानक लोकांपुढे जाताना त्यांची दमछाक होत आहे. दिल्लीत 'ग्लोबल' आणि गावात 'लोकल' राहावे लागते, याचा विसर काँग्रेसच्या पारंपरिक इच्छूक उमेदवारांना पडला. हीच संधी साधून डॉ.नितीन कोडवते यांनी जनसंपर्क व्यापक केल्याने त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सद्य:स्थितीत डॉ.कोडवते यांचे नाव लोकांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे येत असले; तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी त्यांच्यापुढे पहिले आव्हान असणार आहे. मागील पाच वर्षांत वाढलेली महागाई, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण व नोकरीत नसलेले स्थान तसेच अन्य मुद्द्यांवर जनतेत असंतोष असताना काँग्रेसच्या पक्षेश्रेष्ठींचा या जिल्ह्यातील मातीला क्वचितच पदस्पर्श झाला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या जिल्ह्यातील दौरे वाढविल्याशिवाय अंतर्गत गटबाजी संपुष्टात येणार नाही आणि जनतेतील असंतोषही कॅश करता येणार नाही, असे जाणकारांना वाटत आहे. मात्र, या स्थितीतही डॉ.कोडवते हे मोठ्या उमेदीने रात्रंदिवस करीत असलेले दौरे हा चर्चेचा विषय झाला आहे. दौऱ्याच्या बाबतीत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनाही मागे टाकल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या झंझावाती दौऱ्याचा वेग असाच राहिल्यास काँग्रेसमधील अन्य इच्छुकांबरोबरच भाजपचाही अश्वमेघ थबकून जाईल, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये होऊ लागली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9O9WU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना